4 तासानंतर सापडला मृतदेह
तालुक्यातील ढोकनादूंर येथील नितीन रामभाऊ गाडे (22) या तरुणाचा गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेला असता बुडून मृत्यू झाला. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ही घटना शनिवार दि 4 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.
घरात तो एकुलता एक कमविता मुलगा होता. त्याची घरची परिस्थिती गरीबीची असून त्याच्या पश्चात आई व एक बहीण आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील ढोकनादूंर येथील नितीन रामभाऊ गाढे वय 22 वर्षे हा सकाळी गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले असता नदीतील पाण्याचा अंदाज न समजल्याने पाण्यात बुडवत असल्याने गावातील सागर वाल्मिकि बोर्हाडे वय 25 वर्षे याने बघितले असता वाचविण्यासाठी प्रयत्न गेला परंतु सागर यास मयताने मिठी मारली दोघेही पाण्यात बुडवत असल्याने सागरने मिठी सोडली व पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला परंतु वाचविण्यात असफल झाले या घटनेची माहिती गावातील मनसे जिल्हाध्यक्ष घंगाळे व ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. विरगांव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.












